कोणत्याही देशाची बँकिंग व्यवस्था ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असते. स्टॉक मार्केटमद्ये बँका उतरतात आणि त्यामध्ये सामान्य जनता पैसे गुंतवते तेव्हा नक्कीच बँकांचे आर्थिक वजन वाढते आणि सोबतच गुंतवणूक दारांचे देखील म्हणूनच कदाचित जेव्हा परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करतात तेव्हा ते जाणिवपूर्वक बँकिंग स्टॉक्सकडे अधिक लक्ष देतात. विदेशी गुंतवणूकदारांनी बँकिंग शेअर्स विकायला सुरुवात केली तर त्याचा वाईट परिणाम शेअर बाजारावर होताना अनेकदा दिसून आला आहे. परंतु, जेव्हा ते बँकिंग शेअर्स खरेदी करतात तेव्हा बाजार दुप्पट, तिप्पट वाढू शकतो.

विदेशी पोर्टफोलिओ
बँकांचे निकाल केवळ अर्थव्यवस्थेचे आरोग्यच नव्हे तर विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या (FPIs) मूडचेही संकेत देतात. जर एफपीआय विक्रेते झाले तर त्याचा सर्वात मोठा परिणाम बँकिंग क्षेत्रावर होतो. याउलट, त्यांचा कल तेजीचा असेल तर बँकिंग समभाग रॅलीचे नेतृत्व करतात. इकॉनॉमिक टाइम्सने स्टॉक रिपोर्ट्स प्लसचा हवाला देत बँकिंग समभागांची यादी दिली आहे. पुढील 12 महिन्यांसाठी प्रत्येक बँकिंग स्टॉकचे मूल्यमापन करणाऱ्या विश्लेषकांची संख्या देखील या यादीमध्ये समाविष्ट आहे. अहवालाने ते स्टॉक फिल्टर केले आहेत जेथे संभाव्य चढ-उतार 65% पर्यंत आहे.
या यादीमध्ये, तज्ञांनी अंदाज केलेल्या संभाव्य वाढीच्या आधारावर क्रमवारी लावली गेली आहे. 4,000 हून अधिक सूचीबद्ध समभागांसाठी किंमत लक्ष्यांसह पाच प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित केले गेले. यामध्ये कमाई, मूलभूत तत्त्वे, सापेक्ष मूल्यांकन, जोखीम आणि किंमत गती यांचा समावेश करण्यात आला आहे. चला तर मग त्या 9 बँक समभागांबद्दल जाणून अधिक माहिती मिळवूया ज्या एका वर्षात 28-39% परतावा देऊ शकतात.
भविष्यात उत्तम परतावा देणाऱ्या संभाव्य बँकांची यादी
· जम्मू आणि काश्मीर बँक – ही बँक मिड कॅप प्रकारामध्ये मोडते. आणि या बँकेचे मार्केट कॅप 12,207 करोड रुपये इतके आहे. या बँकेचे स्टॉक 39.8% वर उसळी मारतील अशी तज्ञांनी शक्यता वर्तवली आहे.
· सूर्योदय स्मॉल फायनान्स – ही बँक स्मॉल कॅप प्रकारामध्ये मोडते. या बँकेचे मार्केट बॅप 2,124 करोड रुपये इतके आहे. या बँकेचे स्टॉक 39.5% वर उसळी मारतील अशी तज्ञांनी शक्यता वर्तवली आहे.
· उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक- ही बँक मिड कॅप प्रकारामध्ये मोडते. या बँकेचे मार्केट कॅप 5,361 करोड रुपये इतके आहे. या बँकेचे स्टॉक 38.4% वर उसळी मारतील अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
· उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक- ही बँक मिड कॅप प्रकारामध्ये मोडते. या बँकेचे मार्केट कॅप 8,394 करोड रुपये इतके आहे. या बँकेचे स्टॉक 36.4% वर उसळी मारतील अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
· साऊथ इंडियन बँक – ही बँक मिड कॅप प्रकारामध्ये मोडते. या बँकेचे मार्केट कॅप 6,674 रुपये इतके आहे. या बँकेचे स्टॉक 35.6% ने वर उसळी मारतील अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
· सीएसबी बँक- ही बँक मिड कॅप प्रकारामध्ये मोडते. या बँकेचे मार्केट कॅप 5,580 रुपये इतके आहे. या बँकेचे स्टॉक 35.2% वर उसळी मारतील अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
· युनियन बँक ऑफ इंडिया – ही बँक लार्ज कॅप प्रकारामध्ये मोडते. या बँकेचे मार्केट कॅप 95,878 करोड रुपये इतके आहे. या बँकेचे स्टॉक 29.8% वर उसळी मारतील अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
· डीसीबी बँक – ही बँक स्मॉल कॅप प्रकारामध्ये मोडते. या बँकेचे मार्केट कॅप 3,845 करोड रुपये इतके आहे. या बँकेचे स्टॉक 29.5% ने वर उसळी मारतील अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
· इंडसइंड बँक – ही बँक लार्ज कॅप प्रकारामध्ये मोडते. या बँकेचे मार्केट कॅप 107,591 करोड रुपये इतके आहे. या बँकेचे स्टॉक 28.1% वर उसळी मारतील अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
महत्त्वाची सुचना– आम्ही कोणालाही या वेबसाईटवरील कंटेण्टच्या माध्यमातून कोणत्याही गुंतवणूकीबाबत सल्ला देत नाही आहोत. स्टॉक मार्केट मधील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू असून हे काम आम्ही अभ्यासपूर्ण पद्धतीने करीत आहो. शेअर मार्केटमधील कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारासोबत चर्चा करा.