RIL 47th AGM: रिलायंस कंपनीची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा;  पाहा गेल्या 10 वर्षांचा डेटा

RIL 47th AGM: भारतातील नामांकित उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची  दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2 वाजता 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे  सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष  लागले आहेत. कारण या एजीएममधून गुंतवणूकदारांना रिलायन्सच्या भविष्यातील योजनांबद्दल काही ऐकायला आणि जाणून घ्यायला मिळणार आहे.

लिस्टिंगला 50 वर्षे पूर्ण

रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी आपल्या लिस्टिंगला  50 वर्षे पूर्ण करणार आहे, नेहमीच या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील झालेल्या मोठ्या घोषणा आणि भविष्यातील योजना दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांच्या मथळ्या बनतात, परंतु सत्य हे देखील आहे की बहुतेक एजीएम रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्ससाठी चांगली असल्याचे सिद्ध झाले नाही. हे आकडेवारीवरून सिद्ध होते.

AGM आणि RIL समभागांमधील संबंध

कंपनीच्या विधानानुसार, मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2 वाजता 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. समूहाच्या मागील 10 बैठकांपैकी 7 बैठकांमध्ये रिलायन्सचे शेअर्स घसरले होते. 2020 च्या AGM दरम्यान, रिलायन्स कंपनीचे शेअर 6.2% ने घसरला. 28 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या शेवटच्या एजीएममध्ये, रिलायन्सचे शेअर्स 1.51% ने घसरले होते, तोटा किंचित सावरल्यानंतर, तो 1% च्या घसरणीसह बंद झाला होता.

2019 AGM मध्ये समभाग मजबूत होते

वर्ष 2019 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएमच्या दुसऱ्या दिवशी रिलायन्सचा स्टॉक वाढला होता, कारण एजीएमच्या दिवशी शेअर बाजार बंद होता. 2019 मध्ये, AGM नंतर स्टॉक 12.1% वाढला आणि नंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने सौदी अरेबियातील तेल कंपनी अरामकोशी करार जाहीर केल्यामुळे किंचित नफा-बुकिंगनंतर 9.69% वाढीसह बंद झाला. ज्यामध्ये रिलायन्सने अरामकोच्या ऑईल रिफायनरी आणि केमिकल व्यवसायातील 20% हिस्सा खरेदी केला होता. या करारामुळे रिलायन्सच्या शेअर्सना नवसंजीवनी मिळाली होती. त्याच एजीएममध्ये, जिओने इंटरनेटसह जिओ फायबर सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. एजीएमच्या आधी आणि नंतरचे आठवडे पाहिल्यास, मीटिंगच्या आधीच्या आठवड्यात 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर्स घसरले, तर मीटिंगनंतर शेअर्स 8 वेळा उच्चांक गाठून बंद झाले.

कंपनीची गेल्या 1 वर्षातील कामगिरी

रिलायन्सचा स्टॉक 12 महिन्यांत 23% वाढला आहे, तर YTD आधारावर तो 16% वाढला आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, कंपनीचा मागोवा घेणाऱ्या 36 विश्लेषकांपैकी 25 जणांनी स्टॉकला ‘बाय’ रेटिंग दिले आहे, 8 जणांनी ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे आणि ३ जणांनी ‘विकल्याचा’ सल्ला दिला आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेत काय होणार?

जून तिमाहीत कंपनीच्या नफ्यात घट झाली होती आणि मार्जिन देखील 120 बेसिस पॉइंट्सने कमी झाला होता. एप्रिल-जून तिमाहीत कंपनीचा नफा 17.9% घसरून रु. 17,445 कोटी झाला, तर ब्लूमबर्गचा अंदाज रु. 17,654.9 कोटी होता. या कालावधीत, कंपनीचे एकूण कर्ज एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 11.27% कमी होऊन 1,12,341 कोटी रुपये झाले. निव्वळ कर्ज-ते-एबिटा 0.66 पट होता. तसेच  दूरसंचार, तेल, वीजनिर्मिती सारख्या प्रमुख क्षेत्रांशी संबंधित घोषणांवरही गुंतवणूकदार लक्ष ठेवून असणार आहेत. 

Leave a Comment