शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना दुप्पट, तिप्पट किंवा चौपट्ट नफा देतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीच्या शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत ज्या कंपनीने एका वर्षाच्या आत गुंतवणूकदारांच्या पैशांमध्ये 62 पट वाढ केली आहे. ती कंपनी म्हणजे Diamond Power Infrastructure Ltd (DPIL). चला तर मग या कंपनी आणि कंपनीच्या शेअर्सबद्दल अधिक माहिती मिळवूया!

कंपनीबद्दल अधिक माहिती
डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (DPIL) ही भारतातील पॉवर ट्रान्समिशन उपकरणांची उत्पादक कंपनी आहे. कंपनी कंडक्टर, केबल्स आणि ट्रान्समिशन टॉवर्सच्या निर्मिती आणि विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून सर्वोत्तम कामगिरी देखील करीत आहे. ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून भारतातील सर्वात जुन्या केबल आणि कंडक्टर उत्पादकांपैकी एक आहे. वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिकल गुड्स क्षेत्रातील ही सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. त्याची एकत्रित उलाढाल 343 कोटी रुपये आहे
DPIL कंपनीला मिळाली नवी ऑर्डर
डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला हल्लीच इंजिनिअरिंग आणि कंन्सट्रक्शन क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या L&T कंपनीकडून 40.12 करोड रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. AL59 जेब्रा कंडक्टर-न्यू जनरेशन एल्युमीनियम अलॉय कंडक्टर च्या पुरवठ्याची ही ऑर्डर आहे. ही ऑर्डर PV फॉर्म्युलासह ‘किमी दर’ आधारावर प्रदान केला जाईल. हे काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे
3 वर्षात 193954 टक्के परतावा
डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरची किंमत गेल्या 3 वर्षांत 1 लाख 93 हजार 954 टक्क्यांनी वाढली आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2021 रोजी बीएसईवर या कंपनीच्या शेअरची किंमत 73 पैसे होती. पण 16 ऑगस्ट 2024 रोजी किंमत 1416.60 रुपयांवर बंद झाली. एखाद्याने 3 वर्षांपूर्वी 73 पैसे किंमतीच्या शेअर्समध्ये फक्त 10 हजार रुपये गुंतवले असतील आणि अद्याप शेअर्स विकले नसतील तर त्याची गुंतवणूक 1.94 कोटी रुपये झाली असती.
डायमंड पॉवर शेअर किंमत
या पॉवर केबल आणि कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स सध्या 1,445.50 रुपयांवर व्यवहार करत आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 7,617.37 कोटी रुपये आहे. 1,644.95 रुपये हा 52 आठवड्यांचा उच्चांक आणि 22.11 रुपयांचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे. डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये प्रवर्तकांची 90 टक्के हिस्सेदारी आहे, तर सार्वजनिक भागधारकांकडे 9.93 टक्के आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा हिस्सा 0.08 टक्के आहे.
कंपनीचा महसूल वाढला
डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा महसूल 201 टक्क्यांनी वाढून Q1FY25 मध्ये 224 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत केवळ 74 कोटी रुपये होता. जून तिमाहीत ऑपरेटिंग नफा रु. 24 कोटी होता जो गेल्या वर्षी रु. 11 कोटी होता. जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 180 टक्क्यांनी वाढून रु. 17 कोटी झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत रु. 6 कोटी होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2024 साठी, कंपनीने 343 कोटी रुपयांचा महसूल पोस्ट केला. FY24 साठी ऑपरेटिंग नफा ₹43 कोटी होता आणि निव्वळ नफा ₹17 कोटी होता.
महत्त्वाची सूचना – म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक जोखमीवर आधारित असते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.