Zee Entertainment Enterprises Ltd (ZEEL) चे शेअर्स 135.20 रुपयांच्या बंद किमतीच्या तुलनेत 135.20 रुपयांवर उघडले. यानंतर तोडगा निघाल्याची बातमी येताच कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. Zee Entertainment Enterprises Ltd चच्या शेअरने 150 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चला तर मग जाणून घेऊ अधिक माहिती

विषय सविस्तर समजून घेऊ
दिनांक 23 मे 2024 रोजी बातमी आली की Zee Entertainment Enterprises Limited (ZEEL) आणि Sony विलीनीकरणाचा करार रद्द करण्यात आला असून विलीनीकरण योजना रद्द करण्यासाठी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाकडून $90 दशलक्ष (रु. 750 कोटी) च्या टर्मिनेशन फीची मागणी केली.
Sony Pictures Networks India आता Culver Max Entertainment Private Limited (CME) म्हणून ओळखले जाते. सोनी कंपनीने ZEEL आणि CME च्या विलीनीकरणासाठी 22 डिसेंबर 2021 रोजीचा करार रद्द केल्याची माहिती देऊन ZEEL ला नोटीस बजावली होती. परंतु आता सोनी इंडियासोबत करार झाला आहे. व्यवहार रद्द करण्याबाबत तोडगा काढण्यात आला आहे. $90 मिलियन टर्मिनेशन फीसह सर्व दावे मागे घेईल. कंपनी SIAC मधून सर्व खटले मागे घेईल.
शेअरमध्ये झाली वादळी वाढ
कंपनीच्या शेअरची किंमत 12 टक्क्यांनी वाढली आणि दुपारी 3 वाजता शेअर 150 रुपयांच्या पुढे गेला. एका महिन्यात त्यात 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, एका वर्षात स्टॉक 44 टक्क्यांनी घसरला आहे. तीन वर्षांत स्टॉक 11 टक्क्यांनी घसरला आहे.
दोन कंपन्यांमधील करार रद्द होण्या मागचे कारण काय होते
“या हालचालीमुळे कंपनीला सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर (SIAC) आणि इतर मंचांवर चालू असलेल्या लवादाच्या कार्यवाहीमध्ये सोनी विरुद्धच्या सर्व दाव्यांचा आक्रमकपणे पाठपुरावा करण्यास सक्षम करेल,” कंपनीने झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्सने विलीनीकरणाचा करार पूर्ण केला होता. भारतातील सर्वात मोठी माध्यम संस्था होण्याचा मार्ग मोकळा झाला असता. मात्र नव्या युनिटच्या नेतृत्वाबाबत एकमत न झाल्याने ते प्रत्यक्षात आले नाही.