सोन्यावर कर्ज घेणे यालाच मार्केमध्ये गोल्ड लोन असे म्हटले जाते. हे एक सुरक्षित कर्ज आहे, ज्यामध्ये सोन्याचे दागिने, सराफाकडून घेतेल्या सोन्याच्या वस्तू कर्जासाठी बँक किंवा NBFC कडे तारण ठेवल्या जातात. या सोन्याच्या बदल्यात कर्जदाराला ठरावीक कालावधीसाठी कर्ज देण्यात येते. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढताच Manappuram Finance Ltd आणि Muthoot Financeच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चला तर मग या लेखाच्या माध्यमतून अधिक सविस्तर पणे हि संकल्पना समजून घेऊ. Gold Price

मुथ्थुट फायनान्स लिमिडेट
Muthoot Finance Ltdचे शेअर्स बुधवारी दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी रु. 1,991.00 च्या बंद भावानंतर 2,014.45 वर उघडले. यानंतर शेअरने वेग घेतला आणि तो 2,040 च्या वर गेला. शेअरचा सर्वकालीन उच्चांक 2,078.75 रुपये आहे. Gold Price
मन्नपुरम फायनान्स लिमिडेट
Manappuram Finance Ltd कंपनीचे शेअर्स बुधवारी दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी 204.68 रुपयांच्या बंद भावानंतर 206 रुपयांवर उघडला. यानंतर शेअर घसरला पण आता पुन्हा दुसऱ्याच दिवशी हा शेअर वेगाने व्यवहार करु लागला. Gold Price
सोन्याच्या किमती वाढल्याचा फायदा कंपन्यांना कसा होईल?
मणप्पुरम फायनान्ससाठी, गोल्ड लोन पोर्टफोलिओ एकूण व्यवसायाच्या 2/3 आहे, तर मुथूट फायनान्ससाठी, संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गोल्ड लोनचा समावेश आहे. सोन्याच्या किमती वाढल्याने, बदल्यात सोने घेणाऱ्यांची संख्या सहसा वाढते. म्हणजे कर्जाच्या तिकीटाचा आकार वाढतो. सोप्या शब्दात, कंपन्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्याची संधी आहे. याशिवाय गहाण ठेवलेल्या सोन्याची किंमतही वाढते. जर एखाद्या ग्राहकाकडे सोने कमी असेल पण त्याला जास्त कर्ज हवे असेल, तर आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्याला केवळ एलटीव्ही म्हणजेच लोन टू व्हॅल्यू अंतर्गत निश्चित कर्ज मिळेल. पण सोन्याचे भाव वाढल्याचा फायदा त्याला मिळतो. Gold Price
सोन्याचा वित्तपुरवठा करणाऱ्यांच्या नफ्यात वाढ
आरबीआयच्या मार्गदर्शत तत्वानुसार सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने सोन्याचे वित्तपुरवठा करणाऱ्यांच्या नफ्यावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण सोन्याच्या कर्जावर आकारले जाणारे व्याजदर इतर प्रकारच्या कर्जावरील व्याजदरापेक्षा जास्त असतात. याचा अर्थ कर्जाची वाढ जसजशी वाढत जाईल तसतसा सोने फायनान्सर्सचा नफाही वाढू शकतो. त्यामुळे सोन्याचे दर जसजसे वाढत आहेत तस तसे सोन्यावर कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सची देखील किंमत वाढत आहे.