आरारा$$$ खतरनाक…भारतातील सर्वात मोठा IPO लॉन्च आतापर्यंत चे सर्व रेकॉर्डब्रेक

आतापर्यंत भारतीय शेयर बाजारात असंख्य IPO लॉन्च झाले आहेत आणि होत सुद्धा आहेत. बरेच IPO गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देत आहेत तर काही IPO आपल्या गुंतवणूकदारांना निराश करत आहेत असे अनेक IPO आहेत. IPO खरेदी करताना आपल्या दृष्टीकोन हा नेहमी दिर्घकाळ गुंतवणुकीचा असेल तर घेतलेला IPO आपल्याला कधीच निराश करणार नाही हे नक्की.

कोरोनातून उभारल्यानंतर भारतीय शेयर बाजार अत्यंत तेजी मध्ये आहे हे तुम्हाला माहीतच आहे. शिवाय येत्या काळात सुद्धा भारतीय शेयर मार्केट उच्च स्थानी आपल्याला पाहायला मिळेल. येत्या काही दिवसात शेयर मार्केट मध्ये ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये कार्यरत असलेली HYUNDAI कंपनी IPO लॉन्च करणार आहे. HYUNDAI चा हा आयपीएल भारतीय शेयर बाजारातील सर्वात मोठा IPO असणार आहे त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी हा IPO तुमच्यासाठी उत्तम असणार आहे.

Hyundai Motor India ही दक्षिण कोरियन ऑटो कंपनी Hyundai Motors ची उपकंपनी आहे. Hyundai ही कंपनी 25 वर्षांहून अधिक काळ भारतात आहे. Hyundai Motor भारतीय शेयर बाजारात $3 अब्ज (सुमारे 25,000 कोटी रुपये) चा IPO घेऊन येणार आहे. त्यानुसार, कंपनीचे Valuation अंदाजे 20 अब्ज डॉलर्स (सुमारे 1.67 लाख कोटी रुपये) होणार आहे.

2003 साली मारुती सुझुकी ने शेयर बाजारात आयपीएल लॉन्च केला होता त्यानंतर चा सर्वात मोठा IPO ह्युंदाई ही कंपनी लॉन्च करणार आहे. Hyundai India ने जून महिन्यात IPO लाँच करण्यासाठी SEBI कडे कागदपत्रे सादर केली होती. या IPO मध्ये, Hyundai India ची प्रमोटर कंपनी Hyundai Motors च्या शेयर ची विक्री करून अंदाजे 14,21,94,700 शेअर्स ऑफर फॉर सेल ऑफर फॉर सेल साठी ठेवणार आहेत.

सेबी च्या अहवालानुसार, कंपनीचा IPO हा दिवाळीच्या आसपास म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. 

Leave a Comment