LG Electronics India ₹12,582 कोटी किमतीचा IPO लॉन्च करणार आहे!

LG Electronics India IPO: दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी LG आपल्या भारतीय युनिटचा IPO लॉन्च करणार आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, LG Electronics India या IPO मधून $150 कोटी म्हणजेच सुमारे 12,582 कोटी रुपये उभारू शकते. यामध्ये बदलही शक्य आहे. ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हा आयपीओ पुढील वर्षाच्या सुरुवातीला येऊ शकतो. हा IPO व्यवस्थापित करण्यासाठी कंपनीने निवडलेल्या मोठ्या बँकांमध्ये बँक ऑफ अमेरिका, सिटीग्रुप, जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी आणि मॉर्गन स्टॅनले यांचा समावेश आहे.

LG Electronics IPO
LG Electronics IPO

$7,500 कोटी धोरण

जेव्हा शेअर्स $100-150 कोटीच्या IPO नंतर सूचीबद्ध होतात, तेव्हा LG Electronics India चे मूल्य अंदाजे $1,300 कोटी असू शकते. कंपनी एक धोरण म्हणून हा IPO आणत आहे, कारण कंपनीने सन 2030 पर्यंत $7,500 कोटी इलेक्ट्रॉनिक्स कमाईचे लक्ष्य ठेवले आहे आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. कंपनीचे सीईओ विलियम चो यांनी गेल्या महिन्यात ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. LG Electronics India IPO

पुढील महिन्यात सेबीकडे अर्ज

कंपनी पुढील महिन्यात बाजार नियामक सेबीकडे IPO साठी कागदपत्रे दाखल करू शकते. वास्तविक, भारत एक वेगाने विकसित होत असलेली बाजारपेठ आहे आणि ते जागतिक गुंतवणूकदारांना वेगाने आकर्षित करत आहे. येथे वेगाने वाढ होण्याची शक्यता पाहता आणखी अनेक कंपन्या रांगेत आहेत. LG Electronics India IPO

1 ते 1.5 अब्ज डॉलर्सचे किंमतीचे कंपनी शेअर स्टॉक मार्केटमध्ये आणणार

LG Electronics India या कंपनीसाठी भारत एक मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेतून या कंनीने मागील काही वर्षात उत्तम पैसा कमावला आहे. आणि आता या कंपनीच्या संस्थापकांचा प्रयत्न आहे की, भारतात कंपनीचे स्थान आणखी बळकट व्हावे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीचा आयपीओ आगामी वर्षाच्या सुरुवातीला येऊ शकतो. हा आयपीओ आल्यानंतर 1 ते 1.5 अब्ज डॉलर्सचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये येण्याचे संकेत दिसून येत आहेत.  हा आयपीओ भारतीय शेअर बाजारात आल्यास एलजी इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचे एकूण मूल्य जवळपास 13 अब्ज डॉलर्स इतके होणार आहे. या कंपनीच्या आयपीओची साईज आणि तारीखदेखील बदलू शकते. असे अनेक तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. . LG Electronics India IPO

Leave a Comment