1 वर 4 शेअर्स फ्री देण्याचे कंपनीने केले जाहीर; शेअर्स खरेदीदारांनी केली गर्दी


सकुमा एक्सपोर्ट्स लि या कंपनीने गुंतवणूकदारांना 4:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्यासाठी 10 ऑगस्ट 2024 ही रेकॉर्ड तारीख ठरवली होती. बीएसईवर वर दिलेल्या माहितीनुसार आम्ही हे सांगू शकतो.  म्हणजेच रेकॉर्ड तारखेला कंपनीच्या पात्र भागधारकांना प्रत्येक शेअरमागे कंपनीचे 4 मोफत शेअर्स मिळणार होते.  सकुमा एक्सपोर्ट्सचा शेअर्स या वर्षी आतापर्यंत 65 टक्केने वाढला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 1 वर्षात 120 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. शेअर्सने 2006 पासून 620% परतावा दिला आहे. बाजारातील तज्ञांनी शेअर्ससाठी 35 ते 45 रुपये लक्ष्य किंमत निर्धारित केली आहे. चला तर मग 1 वर 4 शेअर्स फ्री देणाऱ्या या कंपनीबद्दल अधिक माहिती मिळवूया.

सकुमा एक्स्पोर्ट्स लिमिटेड कंपनी विषयी माहिती

सकुमा एक्स्पोर्ट्स लिमिटेड 1 डिसेंबर 1998 रोजी मुंबई येथे सकुमा एक्सपोर्ट्स नावाने भागीदारी फर्म म्हणून स्थापन करण्यात आली. त्यानंतर 31 ऑगस्ट 2005 रोजी कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून समाविष्ट करण्यात आली. कंपनी वस्तूंच्या व्यापारात आणि पवन ऊर्जा निर्मितीमध्ये परिणामकारक काम करीत आहे.  ही कंपनी पॉलीप्रॉपिलीन (P.P) पिशव्या तयार करण्याचे काम करते.  वस्तूंचे उत्पादन, व्यापार आणि वीज विक्री अशा दोन विभागांद्वारे कंपनी कार्य करते.  

जानेवारी 2001 मध्ये कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (भारत सरकारचे वाणिज्य मंत्रालय) ने कंपनीला व्यापारी निर्यातदार म्हणून मान्यता दिली आहे. मे 2002 मध्ये कंपनीला ‘निर्यात गृह’ म्हणून मान्यता प्रमाणपत्र देण्यात आले. 2007-08 या वर्षात कंपनीने कच्छ गुजरात येथे 1.2 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेच्या दोन पवनचक्क्या बसवल्या. 2008-09 या वर्षात कंपनीने सुरुवात केली.

P.P चे उत्पादन अहमदाबादमध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट भाडेतत्त्वावर घेऊन पिशव्या करण्याचे काम कंपनी करीत आहे. तसेच महाराष्ट्रातून पूर्व ईशान्य आणि उत्तरेकडील राज्यांना साखरेचा पुरवठा करून देशांतर्गत व्यापार सुरू केला. आज सकुमा एक्स्पोर्ट्स लिमिटेड साखर, खाद्यतेल, तेल बियाणे, कडधान्य, कापूस आणि अनेक विशेष पिकांच्या मोठ्या प्रमाणात कृषी वस्तूंचे प्रमुख खरेदीदार प्रोसेसर, मार्केटर, निर्यातक आणि आयातक म्हणून ओळखली जाते.

सकुमा एक्सपोर्ट्स लिमिटेडचे शेअर मार्केटमधील वजन

शुक्रवारी 9 ऑगस्ट 2024च्या सकाळच्या सत्रात Sakuma Exports ₹7.76 वर 20% वरच्या सर्किटमध्ये लॉक झाले. साकुमा एक्सपोर्ट्सचे शेअर्स वरच्या सर्किट मर्यादेपर्यंत वाढले कारण बोनस शेअर्स जारी करण्यासाठी कंपनीची रेकॉर्ड तारीख शनिवार, 10 ऑगस्ट 2024 दिली होती.  बोनसचे गुणोत्तर 4:1 आहे. हे भागधारकांना अतिरिक्त समभागांसह बक्षीस देण्याच्या कंपनीच्या निर्णयाबद्दल मजबूत गुंतवणूकदार उत्साह दर्शवते.

कंपनी 30 जून 2024 रोजी शेवटच्या तिमाहीतील आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी बुधवारी, 14 ऑगस्ट 2024 रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे. सकुमा एक्सपोर्ट्स मोठ्या प्रमाणात कृषी खरेदी, प्रक्रिया, विपणन आणि निर्यात करण्यात गुंतलेली आहे.

ही कंपनी साखर, खाद्यतेल, तेल बियाणे, कडधान्य, कापूस आणि अनेक विशेष पिकांच्या मोठ्या प्रमाणात कृषी वस्तूंचे प्रमुख खरेदीदार प्रोसेसर, मार्केटर, निर्यातक आणि आयातक आहे. त्याचे बाजार भांडवल ₹1,200 कोटी आहे. गेल्या वर्षभरात, शेअर्स 140% ने वाढले आहेत हे मात्र नक्की. कंपनी भारत, मध्य पूर्व, दक्षिण पूर्व आशिया, सुदूर पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि आफ्रिकेतील वस्तूंच्या गरजा पूर्ण करते. कंपनीचे मार्केट कॅप 957.56 कोटी रुपये आहे.

Leave a Comment