Share Market Today: शेअर बाजारात भरभराट! सेन्सेक्ससह निफ्टीमध्ये सुरु झाली रिकव्हरी रॅली

Stock Market Opening Today:  आज दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी भारातांतर्गत शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. . रक्षाबंधन या सणाच्यानिमित्ताने सर्वच गुंतवणूकदार स्टॉकमध्ये उत्साहाने गुंतवणूक करण्यात व्यस्त असल्याचे जाणवत आहे. कारण आजचे शेअर मार्केटचे आकडे तरी तसेच बोलत आहेत. सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांकांनी सोमवारी तेजीत सुरुवात केली इतकेच नाही तर जागतिक बाजारातून भारतीय शेअर मार्केटसाठी सकारात्मक शुभसंदेश मिळत असल्याचे दिसून येत आहे.  आजचा हा रक्षाबंधनाचा दिवस भारतीय गुंतवणूकदारांसाठी लाभकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे.

शेअर बाजारात तेजीची रॅली

देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये सोमवारी दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी तेजीचे वातावरण दिसून येत होते. 200 पेक्षाही जास्त अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 80,650 अंकांवर व्यवहार करत असून  निफ्टी मार्केट देखील 100 अंकांनी वाढून 24650 अंकांवर सुरु झाले.  बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रात BPCL, ONGC, NTPC, श्रीराम फायनान्स आणि हिंदाल्को या सर्व कंपन्या निफ्टीवर वाढीने व्यवहार करत आहेत. तर काही कंपन्यांच्या व्यवहारात पडझड दिसून आली. त्यापैकी HUL, HDFC life, Maruti Suzuki, Bajaj auto, Infosys या कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना नाराज केल्याचे दिसून आले.

जागतिक  मार्केटमध्ये भारताची स्थिती

जागतिक बाजारातील तेजीदरम्यान शुक्रवारी 16 ऑगस्ट 2024 रोजी देशांतर्गत बाजार चांगलेच फलदायी होते. देशांतर्गत मार्केटसाठी जागतिक बाजारात देखील सकारात्मक वातावरण असल्याचे दिसून येत आहे.  अमेरिकन बाजार शुक्रवारी वाढीसह बंद झाला त्यानंतर  सोमवारी आशियाई बाजारांची सुरुवात चांगली झाल्याचे दिसून आहे. अमेरिकेचे दहा वर्षांचे रोखे उत्पन्न 3.91% वर  स्थिर  होऊन डॉलर निर्देशांक 102.42 वर थोड्या मंदीत दिसत होता. जागतिक बाजारपेठेवर प्रभाव टाकण्याचे काम करणाऱ्या कच्च्या तेलाची किंमतींबद्दल सांगायचे झालेच तर 80 डॉलर प्रति बॅरलच्या खाली या किंमती आल्या आहेत.  

शुक्रवारी अशी होती बाजाराची स्थिती

गुंतवणूकदारांनी आक्रमकपणे आयटी शेअर्स खरेदी केले त्याचे कारण जागतिक बाजारातील तेजीचा काळ असेही अभ्यासकांकडून मत मांडण्यात येत आहे.  भारतात वाढत्या आयटी शेअर्सच्या खरेदीमुळे सेन्सेक्स 1331 अंकांची उसळी घेऊन दोन आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. शेअर मार्केटमधील काही तज्ञांनी याबाबत आनंद व्यक्त देखील केला. यावेळी  निफ्टी 397 अंकांनी वाढून 24500 अंकांवर स्थिरावला. या सर्व परिस्थितीचा भारतीय गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा घेतल्याचे दिसून येत आहे. शेअर मार्केटमधील रोजच्या घडामोडींसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरु नका.

Leave a Comment