स्विगीला IPO साठी SEBI कडून मंजुरी मिळाली, कंपनी $1.2 बिलियन पर्यंत निधी उभारू शकते

भारताच्या शहरी भारात Swiggy  ही कंपनी कोणाला माहिती नाही असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. कारण Swiggy  ही कंपनी फुड डिलिव्हरी करणाऱ्या भारतीय कंपन्यांमधील आघाडीची कंपनी मानली जाते. या कंपनीची सुरुवात 2014 साली झाली. स्विगीचे देशभरातील १,५०,००० रेस्टॉरंटशी करार आहेत. या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधून घराघरातून ऑर्डर करणाऱ्या ग्राहाकंपर्यंत स्विगी खाण्याचे पदार्थ पोहोचवत असते आणि तेही अत्यंत वेगाने. या कंपनीला सेबीने IPO साठी मंजूरी दिली आहे. चला तर मग पाहूया या लेखाच्या माध्यमतून की, कंपनीला किती निधीची गरज आहे आणि कंपनीचे शेअर मार्केटमधील भवितव्य कसे असेल. Swiggy IPO

Swiggy IPO
Swiggy IPO

सेबीकडून IPO साठी मंजुरी

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीला भारतीय बाजार नियामक सेबीकडून IPO साठी मंजुरी मिळाली आहे. रॉयटर्सने या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. सूत्रांनी सांगितले की बेंगळुरूस्थित कंपनी या इश्यूद्वारे $1 अब्ज ते $1.2 अब्ज डॉलर्सचे मूल्य $15 अब्ज उभी करू शकते. तत्पूर्वी, सुमारे 10 दिवसांपूर्वी, ब्लूमबर्ग या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांचा हवाला देत सांगितले होते की कंपनी आयपीओ साठी सेबीच्या मंजुरीची वाट पाहत आहे. त्यानंतर आयपीओचा आकार आणि वेळेच्या तपशीलावर चर्चा सुरू आहे आणि त्यात बदल होऊ शकतात, Swiggy IPO

सुपर फास्ट डिलिव्हरीसाठी झोमॅटो आणि बिगबास्केटशी स्पर्धा

कंपनीची सुरुवात 2014 साली झाली. कंपनीचे देशभरातील १,५०,००० रेस्टॉरंटशी करार आहेत. कंपनी भारतीय बाजारपेठेत झोमॅटो, ई-कॉमर्स Amazon Inc. चे भारतीय युनिट आणि टाटा समूहाच्या बिगबास्केटशी स्पर्धा करते. Swiggy IPO

या वर्षी आतापर्यंत $7.8 अब्ज उभारले

इतर स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्यांप्रमाणे, स्विगी देशाच्या आर्थिक वाढीचा आणि जागतिक गुंतवणूकदारांच्या मागणीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. ब्लूमबर्गने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत, प्रथमच शेअर्सच्या विक्रीतून सुमारे $7.8 अब्ज जमा झाले आहेत. या कंपनीचे टार्गेट खूप मोठे आहे कारण कंपनी प्रत्यक्षरित्या ग्राहकांशी जोडली गेलेली आहे. ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा देणे हे काम कंपनी गेली काही वर्ष अत्यंत उत्तम रित्या करीत आहे.

तुम्ही तयार आहात का या कंपनीचा IPO खरेदी करण्यासाठी?

कोणत्याही कंपनीचा IPO खरेदी करताना त्या कंपनीच्या व्यवसाय आणि नफ्याची योग्य माहिती मिळविणे अत्यंत गरजेचे असते. कारण त्यातूनच कंपनीचे लक्ष आणि ध्येय गुंतवणूकदारांना समजत असते. तुम्ही जर का या कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यास इच्छूक असाल तर आजच तुमच्या आर्थिक सल्लागारासोबत बैठक करुन योग्य तो निर्णय घ्या. शेअर मार्केटमध्ये अभ्यासपूर्ण आर्थिक गुंतवणूक केल्यास फायदा होतो तर कोणताही विचार न करता पैसे गुंतवल्यास नुकसान देखील होऊ शकते. गुंतवणूक दारांना या गोष्टीचा योग्य तो विचार करुनच त्यांचे पैसे गुतंवावे. Swiggy IPO

Leave a Comment