शेअर बाजाराला लागतेय तेजीची चाहूल, या आठवड्यात सेन्सेक्स झाला 80 हजाराच्या पार

Share Market Closing Bell Sensex and Nifty: यावेळी भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी  म्हणजेच शुक्रवारी १६ ऑगस्ट २०२४ ला जबरदस्त तेजीसह बंद झाला. या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी, दोन्ही प्रमुख निर्देशांक ग्रीन राहिले. आज शुक्रवार दिनांक १६ ऑगस्टला  बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) सेन्सेक्स १,३३०.९६ अंकांच्या वाढीसह ८०,४३६.८४ वर तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी तब्बल ४०० अंकांची उसळी घेऊन २४५०० अंकांच्या वर स्थिरावला.

१६ ऑगस्टचा शुक्रवार होता तेजीचा वार

दिनांक १६ ऑगस्ट २०२४ चा शुक्रवार म्हणजे भारतीय शेअर मार्केटसाठी जबरदस्त तेजीचा वार ठरला. BSE वर सूचीबद्ध असलेल्या जवळ जवळ सर्वच्या सर्वच कंपन्यांचे बाजार भांडवल ४.७७ लाख कोटींनी वाढून ४४९.०६ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. आयटी निर्देशांकात कमालीची वाढ  झाल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम असा झाला की,  १३ प्रमुख क्षेत्रांमध्ये नफा नोंदवला गेला.  शुक्रवारच्या व्यवहारादरम्यान CDSL, Zensar Tech, पिरामल इंटरप्राइझेस, पॉलिसी बाजार सेन्सेक्सवरील टॉप गेनर्स ठरले. ही भारतीय शेअर मार्केटच्या दृष्टीने खूप मोठी बाजू आहे. शुक्रवारच्या  दिवसाची सुरुवात शेअर बाजाराने ग्रीन झोनमध्ये केली आणि BSE सेन्सेक्स ६११ अंकांच्या उसळीसह ७९,७१७.६८ वर उघडला तर NSE निफ्टीने ०.७९% वाढीसह २४,३३४.८५ वर ओपनिंग केली.

आयटी क्षेत्रात खरेदीने पकडला जोर

अमेरिकेतील मंदीची चिंता कमी झाली आणि यूएस डॉलरचे मूल्य घसरल्याने शुक्रवारी आयटी समभागांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून निफ्टी आयटी निर्देशांक आज २.८५% वाढून ४०,८६१ वर पोहोचला. आयटी समभागांपैकी Mphasis मध्ये सर्वाधिक किमान ७ टक्क्यांची तेजी नोंदवली गेली.त्याचवेळी, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, विप्रो, टेक महिंद्रा आणि कोफोर्जच्या शेअर्समध्येही लक्षणीय वाढ झाली.

मागील काही दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजाराला चांगले दिवस

मागील काही दिवसांच्या शेअर्सच्या किंमतींमधील घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराला आता सोनेरी दिवसांची चाहूल लागल्याचे दिसत आहे. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भरभराटीच्या सुरुवातीनंतर शेअर मार्केटने एक हजार अंकांपेक्षा अधिक वाढीसह आठवड्याचा शेवट खुपच चांगला केला. जबरदस्त खरेदीच्या जोरावर बीएसई सेन्सेक्सने १३३०.९६ अंकांची झेप घेऊन ८०४३६.८४ मुसंडी मारली तर एनएसई निफ्टी ४०२.९१ अंकांनी वाढून २४५४६.६५ वर बंद झाला.Stock Market Closing

Leave a Comment