वेदांत लिमिटेड या कंपनीने ऑफर फॉर सेल (OFS) च्या माध्यमातून हिंदुस्तान झिंकमधील अधिक शेअर्स विकण्याची घोषणा केली आहे. हिंदुस्तान झिंकच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण कंपनीच्या प्रवर्तक वेदांत लिमिटेडच्या एका मोठ्या घोषणेनंतर झाली आहे.
हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली. हिंदुस्थान झिंकचा शेअर शुक्रवारी 7 टक्क्यांहून अधिक घसरून 528 रुपयांवर पोहोचला. हिंदुस्तान झिंकच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण कंपनीच्या प्रवर्तक वेदांत लिमिटेडच्या एका मोठ्या घोषणेनंतर झाली आहे. वेदांत लिमिटेड या कंपनीने ऑफर फॉर सेल (OFS) च्या माध्यमातून हिंदुस्तान झिंकमधील अधिक शेअर्स विकण्याची घोषणा केली आहे . बुधवारी मुंबई शेअर बाजारात हिंदुस्थान झिंकचा शेअर 572.95 रुपयांवर बंद झाला.

13 कोटींहून अधिक शेअर्स विकण्याची केली घोषणा
वेदांत लिमिटेडने बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर केले की, उपकंपनी असलेल्या हिंदुस्तान झिंकचे 13.3 कोटी शेअर्स विकणार आहे. हे कंपनीच्या एकूण शेअर्सच्या 3.17% आहे. ऑफर फॉर सेलद्वारे कंपनीचे 11 कोटी शेअर्स विकण्या बद्दल वेदांता लिमिटेडने याआधी भारतीय बाजारात चर्चा केली होती. वेदांत लिमिटेडचा हिंदुस्थान झिंकमध्ये 64.92% टक्के हिस्सा आहे.
हिंदुस्तान झिंकच्या शेअर्सची विक्री किंमत 486 रुपये
वेदांत लिमिटेड कंपनीने हिंदुस्तान झिंकच्या शेअर्सची विक्री किंमत 486 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. हिंदुस्थान झिंकच्या बुधवारी बंद झालेल्या किमतीपेक्षा ही किंमत 15 टक्के कमी आहे. बिगर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ऑफर फॉर सेल शुक्रवारी उघडेल. त्याच वेळी सोमवारी ते किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुले होईल. वेदांत लिमिटेड संपूर्ण 13.37 कोटी शेअर्स विकण्यात यशस्वी ठरला तर या ऑफर फॉर सेलमधून 6500 कोटी रुपये या कंपनीला मिळतील. याशिवाय हिंदुस्थान झिंकच्या संचालक मंडळाची 20 ऑगस्टला बैठक होत आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मंडळ दुसऱ्या अंतरिम लाभांशाच्या प्रस्तावावर विचार करेल.