रतन टाटा आणि सचिन तेंडुलकर यांना झाला मोठा फायदा; बघता बघता लाखांची गुंतवणूक करोडोमध्ये बदलली.

मंगळवारी १३ ऑगस्ट २०२४ रोजी रतन टाटा आणि सचिन तेंडुलकर यांना शेअर बाजारात मोठा फायदा झाला. ब्रेनीज सोल्युशन्स जी फर्स्टक्राय या ब्रँडची मूळ कंपनी आहे त्या कंपनीने शेअर लिस्टमधून दोन्ही दिग्गजांना फायदा मिळाला असून कंपनीच्या आयपीओने मंगळवारी शेअर बाजारात खळबळ उडवून दिली. धमाकेदार लिस्टिंगमुळे गुंतवणूकदारांसोबत सचिन तेंडुलकर, रतन टाटा यांच्यासह अनेक दिग्गजांनी चांगली कमाई केली.

FirstCry कंपनीतील मोठे गुंतवणूकदार

FirstCry या ब्रँडअंतर्गत  पुणे येथील ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड ही कंपनी लहान मुलांचे कपडे आणि उत्पादनाची ऑनलाईन विक्री करते. रतन टाटा, सचिन तेंडुलकर, हर्ष मारीवाला, रंजन नाय आणि कंवलजीत सिंग यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी आयपीओपूर्वी या कंपनीत पैसे गुंतवले होते. मंगळवारी १३ ऑगस्ट २०२४  रोजी फर्स्टक्राय कंपनीचे शेअर्स ६५१ रुपयांना सूचिबद्ध झाले असून आयपीओअंतर्गत शेअर्सची किंमत ४४०-४६५ रुपये निश्चित करण्यात आली होती. म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी ४०% हून अधिक नफा खिशात घातला.

रतन टाटांची लाखोंची गुंतवणूक झाली करोडो रुपये

आयपीओ लिस्टिंगपूर्वी रतन टाटांनी या कंपनीत ६६ लाखांची गुंतवणूक केली होती. २०१६ मध्ये दिग्गज उद्योगपतीने फर्स्टक्राय कंपनीचे ७७,९०० शेअर्स ८४.७२ रुपये दराने खरेदी केले होते. अशाप्रकारे आता लिस्टींगनंतर कंपनीच्या शेअर्सच्या यादीत रतन टाटांच्या गुंतवणुकीचे मूल्य पाच कोटींच्या पुढे गेले असून लिस्टिंग किंमतीनुसार रतन टाटांच्या ७७९०० शेअर्सचे मूल्य ५.०७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. रतन टाटांना कंपनीत केलेल्या गुंतवणुकीवर ६७० टक्क्यांचा शानदार परतावा मिळाला आहे.

सचिन तेंडुलकरला मोठा नफा

फर्स्टक्रायचा मूळ कंपनी ब्रेनबीज सोल्युशन्सच्या शेअर्सच्या जबरदस्त लिस्टींगमुळे मास्टर-ब्लास्टरलाही खूप फायदा झाला. तेंडुलकरने कंपनीचे शेअर्स आयपीओच्या किमतीपेक्षा जास्त दराने खरेदी केले होते. मास्टर-ब्लास्टरने कंपनीतील गुंतवणुकीवर ३.३५ कोटी रुपयांहून अधिक नफा कमावला असून ऑक्टोबर २०२३ मध्ये सचिन आणि त्यांची पत्नी अंजली सचिन तेंडुलकर यांनी कंपनीत १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून दोघांनी ४८७.४४ रुपयांनी २.०५ लाखांपेक्षा ताटांपेक्षा अधिक शेअर्स खरेदी केले होते. मंगळवारी फर्स्टक्राय कंपनीचे शेअर्स ६५१ रुपयांवर लिस्ट झाले असून यानुसार सचिन तेंडुलकरच्या गुंतवणुकीचे मूल्य १३.३५ कोटी रुपये झाले आहे. रतन टाटा आणि सचिन तेंडूलकर हे मोठे  गुंतवणूकदार कंपनीतील आयपीओ पूर्वीचे गुंतवणूकदार असून वाटपाच्या तारखेपासून पुढील महिन्यापर्यंत त्यांची गुंतवणूक रिडीम करू शकत नाहीत.

आयपीओ ऑगस्टमध्ये उघडला

दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी ब्रेनबीज सोल्युशन्सचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी उघडला. दिनांक ८ ऑगस्ट २०२४ रोजी बंद झाला. कंपनीचा आयपीओ एकूण १२.२२ पट सबस्क्राइब झाला असून किरकोळ गुंतवणूकदारांचा भाग २.३१ पट सबस्क्राइब झाला.

Leave a Comment