Multibagger Stock Returns: मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पहायला मिळत आहेत. काही कंपन्यांच्या गुंतवणूकदारां तोटा सहन करावा लागला आहे. तर काही कंपन्या त्यांच्या गुतंवणूक दारांना भरभरुन नफा देत आहेत. नफा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलतच आहोत तर एक महत्त्वाची बाब सांगायला नक्कीच आवडेल की, रिलायन्स समुहाच्या एफएमसीजी स्टॉक असलेल्या लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचे नाव आजकाल गुंतवणूकदारांच्या ओठावर असून रिलायन्सच्या या स्टॉकने गुंतवणूकदारांना भरमसाठ परतावा दिला आहे. चला तर मग आपण ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत त्याबद्दल अधिक माहिती मिळवूया.

Lotus Chocolate Company व्यवसायाबद्दल अधिक जाणून घ्या
Lotus Chocolate Company Ltd मुख्यतः चॉकलेट, कोको उत्पादने आणि इतर तत्सम उत्पादने तयार करते. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने (RCPL) २४ मे २०२३ रोजी लोटस चॉकलेट कंपनीमधील कंट्रोलिंग हिस्सा खरेदी केला होता. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड ही मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उप-कंपनी आहे.
मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात
भारततीय स्टॉक मार्केटमध्ये नेहमीच सगळेच गुंतवणूकदार मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असतात. आणि असे उत्तम गुंतवणूकीसाठीचे स्टॉक दिसले की हे गुंतवणूकदारांना कोणताही वेळ न दवडता ते स्टॉक खरेदी करतात, तसेच काही Lotus Chocolate Company Ltd. च्या बाबतीत झाले आहे. आणि गुंतववणूकदारांचा विश्वास खरा देखील ठरला आहे. शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आजवर कधी अल्पावधीत तर कधी दीर्घकाळात शानदार परतावा देत गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत. टाटा आणि अंबानींशी संबंधित अनेक कंपन्यांनी आजवर मल्टीबॅगर परतावा देऊन गुंतवणूकदारांना खुश केले असून अंबानींनी अलीकडेच अधिग्रहण केलेल्या लोटस चॉकलेट कंपनीच्या स्टॉकने भरमसाठ परतावा दिला आहे.
अंबानींच्या कंपनीचा मल्टीबॅगर परतावा
मुकेश अंबानींच्या मालकीच्या लोटस चॉकलेटच्या शेअर्समध्ये अलीकडच्या काही दिवसांत जोरदार वाढ नोंदवली गेली असून शेअर बुधवारी ५% अप्पर सर्किटसह १,८५४ रुपयांवर वधारला जो शेअरचा ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. Lotus Chocolate Company चे शेअर्स गेल्या पाच दिवसांत २१% पेक्षा जास्त उच्चांक गाठला असून मागील एका महिन्यात शेअर्सनी १६५% नी निच्चांक गाठला होता. अशाप्रकारे एकेकाळी ६९९.०५ रुपयांवरून शेअर्सनी १,८५० रुपयांपर्यंत उसळले असून शेअर्सची नीचांकी पातळी २१३ रुपये आहे.
अंबानींच्या मल्टीबॅगर स्टॉकची वेगवेगवान वाटचाल
आतापर्यंत Lotus Chocolate Company Ltd. चे शेअर्स ५१०% हून अधिक वाढले असून दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी शेअर्स ३०३.५० रुपयांना उपलब्ध होते. आणि याच शेअर्सची आज किंमत १,८५४ रुपयांवर पोहोचली आहे. त्याचवेळी, गेल्या सहा महिन्यांत लोटस चॉकलेटच्या शेअर्समध्ये ४३१% वाढ झाली आणि या कालावधीत शेअर्सनी ३४८.७५ रुपयांवरून १,८५० रुपयांवर उसळी घेतली. कंपनीचे मार्केट कॅप २,३८० कोटींवर पोहोचले असून गुंतवणूकदार अत्यंत आनंदात आहेत.
दोन वर्षात शेअर्स १३००% पेक्षा जास्त वधारले
Lotus Chocolate Company Ltd. चे शेअर्स गेल्या दोन वर्षात १३००% पेक्षा जास्त वधारले असून या काळात १२ ऑगस्ट २०२२ रोजी १३१.०५ रुपयांवर होत. गेल्या पाच वर्षात कंपनीचे शेअर्स १५ रुपयांवरून १८०० रुपयांपर्यंत वाढले असून याकाळात शेअर्स १२२६०%नी वधारले असल्याचे चित्र पहायला मिळते.