एनसीसी लिमिटेडचे शेअर्स 5 टक्क्यांपेक्षा जास्तीने वाढले, लाभांशाची रेकॉर्ड तारीख झाली जाहीर

शेअर मार्केटमध्ये कोणती कंपनी कधी लाभांश देईल आणि कितीचा देईल याचा काही निर्बंध नसतो. परंतु एखादी कंपनी गुंतवणूक दारांना लाभांश द्यायचे ठरवते तेव्हा नक्कीच त्या कंपनीचे गुंतवणूकदार मालामाल होतात. बांधकाम कंपनी असलेल्या एनसीसी लिमिटेड म्हणजेच नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी लि. च्या शेअर्सच्या किंमतींमध्ये तुफान  वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी बीएसईवर एनसीसी लिमिटेडचा शेअर 5% पेक्षाही जास्तने वाढून 326.25 रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ अचानक झालेली नाही. तर कंपनीच्या संचालक मंडळाने केलेल्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झालेली दिसून येत आहे. एनसीसी लिमिटेड या कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश पेमेंट देण्यासाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे, चला तर मग पाहूया कोणती आहे ती तारीख.

NCC ltd कंपनीविषयी माहिती मिळवूया

नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (NCC ltd)  ही  एक बांधकाम कंत्राटदार कंपनी आहे. ही कंपनी उड्डाणपूल, महामार्ग, औद्योगिक सुविधा, विमानतळ टर्मिनल, गृहनिर्माण, व्यावसायिक इमारती, शॉपिंग मॉल्स, रुग्णालये, सिंचन, खाणकाम, हायड्रोथर्मल पॉवर आणि पाणीपुरवठा, पर्यावरण प्रकल्पांचे बांधकाम करते. गुजरात, कर्नाटक, ओडिसा, तामिळनाडू, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यासारख्या विविध भारतीय राज्यांमध्ये कंपनीचे विविध प्रकल्प सुरु आहेत. तर जागतिक पातळीवर कंपनी भारत, कुवेत, ओमान आणि UAE मध्ये बांधकाम प्रकल्प राबवते. NCC चे मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा येथे आहे.

4 वर्षांत 795 टक्के वाढ

NCC ltd या कंपनीच्या संचालक मंडळाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.20 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे. एनसीसी लिमिटेडच्या संचालक मंडळाने लाभांश देण्यासाठी दिनांक 30 ऑगस्ट 2024 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. कंपनीचे शेअर्स गेल्या 4 वर्षात 795% ने वाढले आहेत. शेअर्स 21 ऑगस्ट 2020 रोजी 36.40 रुपयांवर होते. आज सोमवार दिनांक 19 ऑगष्ट 2024 रोजी NCC ltd कंपनीचे शेअर्स 326.25 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 2 वर्षांत एनसीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये 390 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

एका वर्षाताल कंपनीचा परतावा

बांधकाम कंपनी एनसीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 117%पेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी 326.25 रुपयांवर पोहोचले  शेअर्स एक वर्षापुर्वी दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी 149.80 रुपयांवर होते.  या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये 95% वाढ झाली आहे. 2024 या वर्षाच्या सुरुवातीलाच 1 जानेवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 166.60 रुपयांवर होते. गेल्या 6 महिन्यांत या  कंपनीने त्याच्या गुंतवणूकदारांना शेअर्सच्या माध्यमातून 43% परतावा दिला आहे. एनसीसी लिमिटेडच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 364.50 रुपये आहे. कंपनीची 136.55 रुपये 52 आठवड्यांची निच्चांक पातळी आहे.

Leave a Comment