1 शेअरवर मिळत आहे 300 रुपयांचा लाभांश; जाणून घ्या कोणत्या कंपनीचा आहे का शेअर

पेज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने शेअर बाजारामध्ये एक्स-डिव्हिडंड शेअर म्हणून व्यवहार केला असून कंपनी एका शेअरवर 300 रुपये लाभांश देत आहे. कंपनी पहिल्यांदाच एका शेअरवर एवढा लाभांश देत असल्याचे दिसून येत आहे.  गुंतवणूकदारांना कुतुहल असेल की ही कंपनी इतका लाभांश कशी देते तर चला मग या कंपनीच्या शेअर्सच्या उलाढाली अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया.

कंपनीबद्दल माहिती मिळवूया

पेज इंडस्ट्रीज लिमिटेड ही इनरवेअर, लाउंजवेअर आणि सॉक्सची भारतीय उत्पादक आणि किरकोळ विक्रेता आहे, ज्याचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. हे भारत, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, ओमान, कतार, मालदीव आणि भूतानमधील जॉकी इंटरनॅशनलचे विशेष परवानाधारक आहे.

कंपनी देते आहे गुंतवणूकदारांना सर्वात मोठा लाभांश

पेज इंडस्ट्रीजने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले की ती एका शेअरवर 300 रुपये लाभांश देईल. कंपनीच्या संचालक मंडळाने अंतरिम लाभांशासाठी शनिवार 17 ऑगस्ट 2024 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती. परंतु शनिवारी  सुट्टी असल्याने कंपनीने शुक्रवारी 16 ऑगस्ट 2024 रोजी शेअर बाजारात एक्स-डिव्हिडंड ट्रेड केला. या कंपनीच्या आतापर्यंतच्या कालखंडात  गुंतवणूकदारांना इतका मोठा लाभांश एका शेअरवर कधीही दिला गेला नव्हता.

केव्हा दिला होता पहिल्यांदा लाभांश

जॉकी ब्रँड अंतर्गत कपड्यांचे उत्पादन करुन विकणारी मोठी कंपनी पेज इंडस्ट्रीज लिमिटेडने 2007 मध्ये सर्वप्रथम लाभांश दिला होता.  तेव्हापासून कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांना दरवर्षी लाभांश दिला आहे. त्यानंतरचा रेकॉर्ड पाहता  2020 सालापासून पेज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने एका शेअरवर 100 रुपये किंवा त्याहून अधिक लाभांश त्यांच्या गुंतवणूक दारांना मिळवून दिला आहे. कंपनीने एक्स-डिव्हिडंड शेअर म्हणून 31 मे 2024 रोजी शेवटचा व्यवहार केला होता. त्यानंतर मात्र गुंतवणूकदारांना कंपनीने एका शेअरवर 120  रुपयांचा लाभांश देण्याचे ठरवले. 2024  या वर्षात आतापर्यंत पेज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांना 220 रुपयांचा लाभांश तब्बल दोनदा दिला आहे.

अशी आहे शेअर बाजारात कंपनीची कामगिरी

BSE वर बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह 40650.05 रुपयांवर बंद झाले होते.  मागील 6 महिन्यांत पाहता या कंपनीच्या शेअरच्या किंमती चक्क 11 टक्क्यांहून अधिक घसरलेल्या दिसून येत आहेत.  पेज इंडस्ट्रीजचा गेल्या एक वर्षापासून शेअर असलेल्या गुंतवणूकदारांचा आतापर्यंत 0.9 टक्के वाढ झाला आहे. कंपनीची शेअर बाजारातील 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 42,902.10 रुपये असून 52 आठवड्यांची नीचांक पातळी 33,100 रुपये इतकी आहे. कंपनीचे बाजार भांडवल 45,340.55 रुपये इतके आहे.

Leave a Comment