ICICI सिक्युरिटीजन च्या अनुसार हा स्टॉक गुंतवणूकदारांचा खिसा रिकामा करणार ?

माझगाव डॉक शिपबिल्डर्स या कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण मागील तीन महिने या कंपनीने भरभरुन नफा दिला असला तरी आता मात्र ही कंपनी गुंतवणूकदारांना तोट्यात आणू शकते असे दिसून येत आहे.  देशांतर्गत ब्रोकरेज ICICI सिक्युरिटीजने माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या संरक्षण समभागातील गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा वाजवली असून ब्रोकरेज फर्मने  असेही म्हटले आहे की, पूर्वी प्रचंड नफा कमावणारा मल्टीबॅगर स्टॉक आता मोठ्या घसरणीला बळी ठरू शकतो. ICICI ब्रोकरेज हाऊस देशातील सर्वात मोठी सरकारी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्सवर मंदीचे सावट असल्याचे मत मांडले आहे.

हा मल्टीबॅगर शेअर करेल खिसा रिकामा

जून तिमाहीत कंपनीची कामगिरी सर्वोत्त होती. माझगाव डॉकच्या शेअर्सने 5860 रुपयांच्या उच्चांकावर गगन भरारी घेतली होती. परंतू अर्थसंकल्पाच्या मांडणीनंतर या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत घट दिसून यायला लागली. मागिल आठवड्यात शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सची किंमत 0.67% घसरली आणि शेअर 4965 रुपयांवर बंद झाला जो माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या उच्चांकापेक्षा 15% कमी आहे. पण तिमाही निकालानंतर ICICI सिक्युरिटीजने या संदर्भात चिंताजनक अहवाल जाहीर केला ज्यानुसार 5000 रुपयांचा शेअर 1200 रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ असा की, कंपनीचे स्टॉक सध्याच्या पातळीपासून 70 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतात.

ब्रोकरेज चा धक्कादायक अहवाल सादर

“माझगाव डॉक शिपबिल्डर्सने आतापर्यंत चांगले काम केले आहे परंतु कंपनीच्या मूल्यांकनाबाबत अजूनही चिंता व्यक्त केली जात आहे” असे ब्रोकरेजने दिलेल्या अहवालात मांडण्यात आले आहे.   मागिल आठवड्यातील शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स घसरले आणि ही घसरण या आठवड्यात सोमवार पर्यंत सुरुच होती. या कंपनीचा शेअर 4793.20 रुपयांच्या जवळपास ट्रेंड करत असून 5860 शेअर्सचा उच्चांक आहे. कंपनीवरील कर्ज नगण्य असून कमाईचा दृष्टीकोनही चांगला आहे. आर्थिक वर्ष 2027 पर्यंत मार्जिन अबाधित राहण्याची अपेक्षा आहे. असे असूनही ब्रोकरेजने SELL रेटिंग कायम ठेवली पण लक्ष्य 900 रुपयांवरून 1165 रुपयांवर वाढवले असल्याचे दिसून येत आहे.

मागील पाच दिवसातील कंपनीचे शेअर्स

माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअरची किंमत मागिल पाच दिवसांत सुमारे 2.5%नी घसरली असून कंपनीचा स्टॉक एका महिन्यात 4.5% खाली आला आहे. अर्थसंकल्प 2024 मांडण्याच्या आधीपर्यंत या कंपनीचा स्टॉक गगनभरारी घेत होता परंतु अर्थंसंकल्प मांडल्यानंतर मात्र या कंपनीचे शेअर्स झपाट्याने तोट्यात दिसत आहेत. माझगाव डॉक शिपबिल्डर्स या कंपनीचे स्टॉक शेअर मार्केटमध्ये पडण्यापूर्वी ही कंपनी बाजारातील सर्वोत्तम मल्टीबॅगर कंपन्यांपैकी एक असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात होते.

Leave a Comment