भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या काही कंपन्यांचे शेअर्स इतक्या तेजीमध्ये आहेत की या कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांवर अक्षरशः धनवर्षाव सुरु केला आहे. त्यापेकी एक म्हणजे Indian Renewable Energy Development Agency Limited ही कंपनी. या कंपनीला इरेडा (IREDA) नावाने देखील ओळखले जाते. या कंपनीचे शेअर्स गुरुवार दि. 22ऑगस्ट 2024 रोजी सुरुवातीच्या सत्रात अत्यंत तेजीत धावत असल्याचे दिसून आले. सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीचे शेअर्स 7% पेक्षा जास्त किंमतीने वधारले. इतकेच नव्हे तर या कंपनीने गुंतवणूकदारांना गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर रिटर्न्स मिळवून दिले आहेत. गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणारी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या कंपनीचे शेअर्स गुरुवारी बुलेट ट्रेनच्या वेगाने व्यवहार करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. चला तर मग या कंपनीच्या शेअर्सबद्दल अधिक माहिती मिळवूया.

इरेडा शेअरने पकडला वेग
अगदी कमी किंमतीतील स्टॉकमधून मल्टीबॅगर बनलेल्या या कंपनीच्या स्टॉकने फक्त नऊ महिन्यांतच गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या 9 महिन्यांच्या कालावधीत लोकांना 325% पेक्षाही जास्त परतावा दिला आहे. कंपनीच्या बोर्ड कमीटीची 29 ऑगस्ट रोजी बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी शेअर्स जारी करून 4,500 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.
गुंतवणूकदारांसाठी ही कमाईसाठी मोठी संधी असेल
IREDA या कंपनीने तिच्या गुंतवणूकदारांना खूप जास्त परतावा दिला असून लिस्टिंगनंतर कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर बनले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस सूचीबद्ध झालेल्या इरेडाने 32 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 310 रुपयांच्या उच्चांकी किंमतीवर मजल मारली होती. पण गेल्या काही काळापासून स्टॉकमध्ये सतत घट झाली आणि सुमारे पाच आठवड्यात स्टॉक 21% खाली आला.
IREDA कंपनीच्या संचालक बैठकीतील निर्णय
BSEच्या नियामक फायलिंगमध्ये सेबीच्या नियमावलीनुसार इरेडा कंपनीची संचालक मंडळाची बैठक 29 ऑगस्ट 2024 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीत शेअर्स देऊन गुंतवणूकदारांकडून कंपनी 4,500 कोटी उभे करणार असल्याच्या मुद्द्यावर चर्चा होऊन संचालक मंडळाने या गोष्टीस बैठकीत मान्यता दिली आहे. कंपनीच्या पुढील प्रकल्पांसाठी लागणारा हा निधी FPO, QIP (क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट), राइट्स इश्यू, प्रेफरन्शियल इश्यू किंवा इतर पद्धतींद्वारे एक किंवा अधिक टप्प्यांत उभारला जाईल ज्यासाठी कायदेशीर आणि सरकारी मान्यता कंपनीमार्फत घेण्यात येणार आहे असेही संचालक मंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले.
आतापर्यंत इरेडा कंपनीच्या शेअर्स उच्चांकावरून सुमारे 23%नी खाली आले आहेत. गुरुवारी 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमार इरेडाचे शेअर्स 7.11% किंवा 17 रुपयांनी वाढून 255.95 रुपयांवर व्यवहार करत होते.