कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्सची किंमती रातोरात वाढली; नेमके काय घडले जाणून घ्या!

बॉलिवूडचे बिग बी ज्या कंनपीचा जाहिरात करतात त्या कल्याण ज्वेलर्स या कंपनीच्या शेअर्सच्या किंमती रातोरात रॉकेटच्या वेगाने वर गेल्या आहेत. आज बाजार उघडताच कल्याण ज्वेलर्सच्या समभागांनी जवळपास सात टक्क्यांनी उसळी घेतली. मागील सत्रात तो बीएसईवर 548.15 रुपयांवर बंद झाला होता आणि आज सुरुवातीच्या व्यवहारात 7% पेक्षा जास्त उडी घेऊन या कंपनीचा शेअर 589 रुपयां वर पोहोचला आहे. या मागे नेमकं काय कारण आहे आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया. kalyan jewellers shares rise

असे काय झाले रातोरात

गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी शेअर मार्केट सुरु होताच  ज्वेलरी कंपनी असलेल्या कल्याण ज्वेलर्सच्या समभागांनी चक्क 7%नी उसळी घेतली. असे सांगण्यात येते की अमेरिकन पीई फर्म वॉरबर्ग पिंकसने कल्याण ज्वेलर्समधील 2.36% असलेला त्यांचा हिस्सा विकण्याची घोषणा केली आहे. कल्याण ज्वेलर्सचे  संस्थापक टी एस अय्यर कल्याणरामन तो हिस्सा विकत घेतील. Highdell 535 रुपये प्रति शेअर दराने 24 दशलक्ष शेअर्सची विक्री करेल. कल्याणरामन यांच्याकडे सध्या कंपनीत 60.59% हिस्सा आहे. या डीलमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे

कंपनीची स्थापना आणि कामगिरी जाणून घ्या

कल्याण ज्वेलर्सचे देशभरात दागिन्यांचे शोरूम असून त्रिशूर येथे या कंपनीचे मुख्यालय आहे. टीएस कल्याणरामन यांनी 1993 मध्ये त्याची स्थापना केली होती. कंपनी मार्च 2021 मध्ये सूचीबद्ध झाली. सकाळी 10.30 वाजता कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स 4.98% वाढून 575.45 रुपयांवर व्यवहार करत होते. आजची परिस्थिती पाहता कल्याण ज्वेलर्स कंपनीचे मार्केट कॅप 59,255.12 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

यावर्षी कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स 60%नी वाढले

या वर्षी आतापर्यंत कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स सुमारे 60 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीची 52 आठवड्यांची उच्च पातळी 633.35 रुपये असून दिनांक 24 जुलै 2024 रोजी कंपनीच्या समभागांनी ही पातळी गाठली होती. तर गेल्या वर्षी 25 सप्टेंबर 2023 रोजी  कंपनीच्या शेअर्सनी 52 आठवड्यांचा नीच्चांकी पातळी गाठली होती, तेव्हा शेअर्सचा दर 202.60 रुपये होता. यूएस प्रायव्हेट इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंकसची हायडेलच्या माध्यमातून कल्याण ज्वेलर्समध्ये 9.2% हिस्सा आहे. वारबर्गने कल्याण ज्वेलर्समध्ये 2014 मध्ये पहिल्यांदा गुंतवणूक केली. मार्च 2021 मध्ये कंपनीच्या लिस्टिंगनंतर त्यांनी 24.6% हिस्सा घेतला होता. kalyan jewellers shares rise

Leave a Comment