आज शेअर मार्केटमध्ये पुन्हा नवनवीन बातम्यांचा झोन दिसून आला. त्यात सध्या प्राइस बँडशी संबंधित माहिती समोर आलेली नाही. बजाज हाऊसिंग फायनान्स ही बजाज फायनान्सची पूर्ण मालकीची उपकंपनी असून या कंपनीने IPO द्वारे 6,560 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPO दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी उघडणार असून दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी बंद होणार आहे.चला तर मग अधिक माहिती मिळवूया या कंपनीच्या शेअर्सबद्दल. bajaj housing finance ipo

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस नुसार माहिती
RHP नुसार, IPO मध्ये 3,560 कोटी रुपयांचा नवीन इश्यू आहे. तर प्रवर्तक कंपनी बजाज फायनान्सकडून 3,000 कोटी रुपयांचे शेअर्स विक्रीसाठी ऑफर केले जातील. इक्विटी शेअर्सचे दर्शनी मूल्य रु 10 प्रत्येक शेअर ठेवण्यात आले आहे. गुंतवणूकदारांमध्ये नक्कीच उत्सुकता दिसून येत आहे.
कंपनी पैसा कुठे वापरणार?
प्रत्येक गुंतवणूकदाराला कुतुहल असते की कंपनी IPO मधून उभारलेल्या निधीचा वापर कसा करणार आहे. कारण गुंतवणूकदारांचे पैसे त्यावर अवलंबून असतात. कंपनी आयपीओ मधून उभारलेला निधी भांडवली पाया वाढवण्यासाठी करेल, जेणेकरून भविष्यातील व्यावसायिक गरजांसाठी निधीची व्यवस्था करता येईल. म्हणजे कर्ज देण्याची क्षमता वाढवता येईल. bajaj housing finance ipo
कोणासाठी किती वाटा राखीव? जाणून घ्या!
IPO 6 सप्टेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी उघडेल. अँकर गुंतवणूकदार QIB (पात्र संस्थात्मक खरेदीदार) च्या 60% पर्यंत सदस्यता घेऊ शकतात. तर त्याच्या वाटपाचा एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी ठेवण्यात आला आहे. bajaj housing finance ipo
कर्मचाऱ्यांचा कोटा ‘पोस्ट ऑफर पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल’ च्या 5 % (जास्तीत जास्त) ठेवण्यात आला आहे. तसेच गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांबद्दल बोलायचे तर, एक तृतीयांश रक्कम इक्विटी शेअर्समध्ये 2 ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान गुंतवणूक करण्यासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी राखीव आहे. तर 10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्यांसाठी दोन तृतीयांश जागा कंपनीमध्ये राखीव ठेवण्यात आली आहेत. bajaj housing finance ipo
कंपनी आर्थिक विकास
बजाज हाऊसिंग फायनान्सचा PAT म्हणजेत चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा 381 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर ही वाढ 26% आहे. कंपनीच्या निव्वळ व्याज उत्पन्नात 11% (YoY) वाढ झाली आणि ती 629 कोटी रुपये झाली.कंपनीच्या AUM मध्ये वार्षिक आधारावर 32% वाढ झाली आहे आणि AUM रु. 91,370 कोटी झाली आहे. तर निव्वळ एकूण उत्पन्न 14% ने वाढून (YoY) रु 717 कोटी झाले. कंपनीच्या कर्ज वितरणात देखील वार्षिक आधारावर 26% ची वाढ नोंदवली गेली आणि कर्ज वितरण वाढून 11,393 कोटी रुपये झाले आहे. bajaj housing finance ipo–