GV Films ltd या कंपनीच्या शेअर्सनी शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी नोंदवली आहे. याकारणाने गुरुवारी दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी गुंतवणूकदारांनी चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी GV Films ltd च्या शेअर्सची खरेदी केली. यामुळे शेअर्सला 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर मागील बंद 0.81 पैशांच्या तुलनेत 0.89 पैशांवर बंद झाला. 12 फेब्रुवारी 2024 रोजी GV Films ltd कंपनीच्या एका शेअरची किंमत 1.20 रुपये होती, हा कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. तसेच 3 ऑगस्ट 2023 रोजी शेअरची किंमत 0.40 पैसे होती. हा शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे. या कंपनीचा 100% हिस्सा सार्वजनिक भागधारकांकडे आहे.

कंपनीविषयी जाणून घेऊ
स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध कंपन्यांपैकी एक जीव्ही फिल्म्स लि.; कंपनी चांगली कामगिरी करत आहे म्हणूनच या कंपनीच्या शेअरच्या किंमती वाढत आहेत. कंपनी नुकतीच एक्सचेंजेसवर सार्वजनिक झाली आणि, तुलनेने कमी कालावधीत कंपनीने समभाग मूल्याचे योग्य प्रमाण गाठले आहे. GV Films Ltd च्या स्टॉकच्या किमतींबाबत विविध अंदाज वर्तवले जात आहेत. परंतु आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअर्सची सत्यपरिस्थीत सांगू इतके मात्र नक्की.
कंपनीने केला सामंजस्य करार
GV Films ltdने स्टॉक एक्सचेंज फाइलिंग दरम्याने महत्त्वपूर्ण घोषणा केली. यावेळी जीव्ही फिल्म्स लिमिटेड कंपनीने ओंकार फिल्म्स आणि राज टेलिव्हिजनसोबत सामंजस्य करार करीत असल्याचे सांगितले. या कराराचा उद्देश असा आहे की, तामिळ, हिंदी आणि तेलुगू भाषांमधील तब्बल 5,710 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचे एका लायब्ररीमध्ये रुपांतर करुन त्यांचे संकलन करणे. याकामासाठी जीव्ही फिल्म्स लिमिटेडने विशेष डिजिटल अधिकार देखील मिळवले आहेत. कंपनीने असेही सांगितले की, 50 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करून त्यांनी हे डिजिटल अधिकार समकालीन ओटीटी मानकांमध्ये श्रेणीसुधारित करण्याचे ध्येय ठेवले आहे. एकदा पूर्ण झाल्यानंतर डिजिटल लायब्ररी जीव्हीच्या स्वतःच्या एंड-टू-एंड ओटीटी/आयपीटीव्ही प्लॅटफॉर्म प्रकाशनासाठी किंवा स्थापित ओटीटी प्लॅटफॉर्मवर आउटसोर्सिंग/परवाना देण्यासाठी उपलब्ध असेल.
निधी उभारण्यास मिळाली संचालक मंडळाकडून मान्यता
कंपनीच्या संचालक मंडळाने 31 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि कंपनीच्या 95 कोटी शेअर्स विकण्यास मान्यता देखील देण्यात आली. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले 95 कोटी शेअर्स वाटप करण्यास पारवानगी दिली आहे. कारण या शेअर्सच्या मदतीने निधी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.
GV Films ltd मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी विचारात घ्यायचे मुद्दे
· GV Films ltd च्या समभागांमध्ये गुंतवण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने पूर्वनिश्चित केली जावी; गुंतवणुकीसाठी फक्त एक अनुकूल रक्कम आवश्यक आहे ज्यावर गुंतवणूकदाराचे नुकसान सहन करण्यायोग्य आहे.
· GV Films ltd च्या गुंतवणुकीच्या उद्देशांसाठी उपलब्ध असलेल्या निधीची पुनर्तपासणी करणे आवश्यक आहे आणि कोणता निधी अधिक फायदेशीर ठरेल हे स्पष्ट निधी मिळविण्यासाठी इतर फंडांशी तुलना करणे आवश्यक आहे.
· GV Films ltd च्या स्टॉक्समध्ये समाविष्ट असलेल्या जोखीम घटकांचा विचार करणे आवश्यक आहे कारण या घटकांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते; स्टॉक एक्स्चेंजवरील प्रत्येक सूचीबद्ध स्टॉकमध्ये जोखीम घटक समाविष्ट केले जातात परंतु जोखीम घटकांचे प्रमाण भिन्न असू शकते.