54 रु. प्रती शेअर असलेल्या या कंपनीच्या शेअरची किंमत 143 रुपयांवर पोहोचली, एलआयसीकडे आहेत कंपनीचे तब्बल 8 कोटी शेअर्स

एसजेव्हीएन लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत मंगळवारी ६ ऑगस्ट 2024 रोजी  3% नी वाढ झाली आहे.  कंपनीचा शेअर इंट्राडे उच्चांक 143.55 रुपयांवर पोहोचला असून या वर्षी कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 52% ने वाढ झाली आहे.  वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 54 रुपये होती. या वर्षी कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 52% ने वाढले आहेत. त्याच वेळी शेअर्स गेल्या एका वर्षात 155% ने वाढला आहे. चला तर मग एसजेव्हीएन लिमिटेड या कंपनीबद्दल अधिक माहिती मिळवूया.

एसजेव्हीएन लिमिटेड उर्जा निर्मिती करणारी कंपनी

 Satluj Jal Vidyut Nigam Ltd (SJVN) ही जलविद्युत उर्जा निर्मिती करुन विक्री करणारी एक नामांकित कंपनी आहे. तसेच  हे जलविद्युत प्रकल्पांचे डिझाईनिंग, परीक्षण, संचालन, नियोजन, विकास, अंमलबजावणी आणि देखभाल देखील ही कंपनी करते. एसजेव्हीएन ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. ही कंपनी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, नेपाळ आणि भूतानमध्ये जलविद्युत प्रकल्प चालवते. SJVN चे मुख्यालय शिमला, हिमाचल प्रदेश येथे आहे.

LIC कडे कंपनीचे 8 कोटी शेअर्स

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी . LIC ची एसजेव्हीएन लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी भागीदारी आहे. एलआयसीकडे 8,89,94,881 शेअर्स असून या कंपनीमध्ये LIC चा 2.26% हिस्सा आहे. कंपनीचा शेअर इंट्राडे उच्चांक 143.55 रुपयांवर पोहोचला

2024 च्या जून तिमाहीत शेअर्स वाढले

बीएसईवर जारी केलेल्या जून तिमाहीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नच्या आधारावर LIC  ने सरकारी हायड्रो पॉवर कंपनीमधील आपला हिस्सा 2.26% पर्यंत वाढवला आहे. मार्च तिमाहीच्या शेवटी LICकडे  एसजेव्हीएन कंपनीमधील 1.73% हिस्सा होता. हे पाहता भारतीय म्युच्युअल फंड्स देखील एसजेव्हीएनमधील त्यांची हिस्सेदारी किरकोळ वाढवली आहे. जून तिमाहीच्या अखेरीस म्युच्युअल फंडांनी एसजेव्हीएनमध्ये 1.56 टक्के हिस्सा घेतला असून मार्च तिमाहीतील त्यांच्या 1.54% हिस्स्यापेक्षा जास्त आहे. सरकार अजूनही एसजेव्हीएनमधील सर्वात मोठे भागधारक असून हा हिस्सा 81.85 टक्के आहे.

शेअर मार्केटमधील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडले जा. व्हॉट्सॅप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही आमच्या वेबसाईटवरील शेअरमार्केट विषयीची नवनवीन माहिती मिळवू शकाल. कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याआधी त्या कंपनीचा इतिहास आणि कंपनीची ग्रोथ याचा योग्य अभ्यास करा. 

Leave a Comment