काहीच न करता फक्त गुंतवणुक करून करोडपती होण्याचा मार्ग म्हणजे शेअर मार्केट. आजकाल शेअर मार्केटचे वेड सर्वांनाच लागले आहे. कारण कधी अल्पावधीत तर कधी जास्त काळ गुंतवणूक करून दुप्पट तिप्पट नफा कमवण्यासाठी शेअर मार्केट गुंतवणूकदारांना फायद्याचा ठरतो. आतापर्यंत तुम्हीही अशा काही कंपन्या पाहिल्या असतील ज्यांनी गुंतवणूकदारांना अल्पावधीतच कोट्यावधींचे मालक बनवले आहे. परंतु मोठा परतावा देणाऱ्या कंपन्या या मोजक्याचा आहेत. ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना केवळ एका वर्षात मोठा परतावा दिला आहे. आज आपण अशाच एका स्टॉप बद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षातच करोडपती बनवले आहे.

श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क
तुम्ही श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड ही कंपनी ऐकलीच असेल. ही कंपनी पूर्वी सब टीव्ही चॅनल चालवत होती. परंतु आता ही कंपनीकडे अनेक चॅनेल चालवत आहेत. आता ही कंपनी मस्ती, दबंग, गुजरात, दिल्लगी आणि मायबोली हे चॅनल चालवत आहे. त्यामुळे या कंपनीचा आवाका जशा प्रकारे मोठा झाला आहे. त्याच प्रकारे या कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षात मोठा परतावा देखील दिला आहे. ज्याचं कारण म्हणजे एका वर्षातच या शेअरची किंमत झपाट्याने वाढली आहे.
किती आहे शेअरची किंमत?
बीएसईवर 7 ऑगस्ट रोजी श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड या कंपनीचा शेअर्स 418.35 रुपयांवर बंद झाले होते. दुसरीकडे या कंपनीच्या वर्षभराच्या शेअर्सच्या किमती बद्दल बोलायचे झाले, तर 7 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.76 रुपये इतकी होती. ज्यामध्ये आता वाढ होऊन 2024 मध्ये या शेअर्सची किंमत 418. 35 रुपये झाली आहे. एकंदरीत वर्षभरात या कंपनीचा स्टॉक 23670 टक्क्यांनी वाढला आहे.
गुंतवणूकदारांना वर्षभरात किती मिळाला परतावा
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये गेल्या वर 50 हजार रुपये गुंतवले असते आणि ते शेअर आजही विकला नसेल तर त्या तो गुंतवणूकदार करोडपती झाला असेल. कारण गेल्या वर्षी 50 हजार गुंतवल्यास आज त्या गुंतवणूकदारांना 1,18, 85,000 रुपयांचा परतावा मिळाला असेल. दुसरीकडे एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्यावर्षी दहा हजार रुपये गुंतवले असतील, तर त्या गुंतवणूकदाराचे आज 23.77 लाख रुपये झाले असते. त्याचबरोबर एखादा गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाखांची गुंतवणूक वर्षभरापूर्वी केली असती, तर त्या गुंतवणूकदाराला आज 2,37,70,000 इतका मोठा परतावा मिळाला असता.