Tata हा भारतीय उद्योग समुह याअंतर्गत चालणाऱ्या अनेक कंपन्या भारतात आणि भारताबाहेर कार्यरत आहेत. त्यापैकी Tata Teleservices Maharashtra Limited (TTML) या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची अस्थिरता दिसून आली आहे. इतकेच नाही तर या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवलेल्यांना कंपनीने तब्बल 49% पर्यंत परतावा दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टाटा कंपनीच्या या वाढत्या शेअर्सच्या किंमती बद्दल.

टाटा समुहाची Tata Teleservices Limited कंपनी
Tata Teleservices Limited ही टाटा समूहाअंतर्गत काम करणारी कंपनी असून ही कंपनी भारतातील विविध भांगांमध्ये दूरसंचार सेवा प्रदान करते. टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड, तिची उपकंपनी टाटा टेलीसर्व्हिसेससह एकत्रितपणे एंटरप्राइझ क्षेत्रातील एक उदयोन्मुख बाजारपेठ आहेत. हे टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस (TTBS) ब्रँड नावाखाली देशातील व्यवसायांसाठी कनेक्टिव्हिटी, सहयोग, क्लाउड आणि SaaS, सुरक्षा आणि विपणन सोल्युशन्स सर्वसमावेशक पोर्टफोलिओ ऑफर करते.
टाटा समुहाच्या TTML या कंपनीमध्ये प्रचंड तेजी नोंदवली जात असून गुरुवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची वाढ झाली आणि 98.20 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. टाटा समूहाचा हा शेअर एका महिन्यात 30%नी वाढला आहे. TTML कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 111.48 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 65.29 रुपये इतका आहे. इतकेच नाही तर या कंपनीचे बाजार भांडवल 18,947.16 कोटी रुपये इतके आहे.
7% झाली शेअर्समध्ये वाढ
Tata Teleservices Maharashtra Limited कंपनीच्या शेअर्समध्ये 8 ऑगस्ट 2024 रोजी 7 टक्क्यांनी वाढ झाल्यचे दिसून आले आहे. ही एक खूप मोठी भरभराट आहे आणि टाटा कंपनीच्या या शेअर्समध्ये ज्यांनी पैसे गुंतवले त्यांना 7 पट फायदा झालेला आहेय
TTML च्या शेअर्सची 5 वर्षांतील कामगिरी
Tata Teleservices Maharashtra Ltd (TTML) चे शेअर्स गेल्या पाच वर्षात 4800% वाढले आहेत. या कालावधीत शेअरची किंमत 2 रुपयांवरून 98.20 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या काळात एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आतापर्यंत 49 लाख रुपयांचा नफा झाला असता.