सध्या शेअर मार्केटमध्ये बऱ्याच अशा कंपन्या नफा कमावत आहेत. कारण या कंपन्यांना मोठमोठ्या ऑर्डर्स मिळत आहेत. ज्याचा परिणाम थेट त्यांच्या शेअर्सवर होत आहे. त्यांच्या शेअर्सच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्याचा मोठा फायदा मिळत आहे. तुम्ही जर नवकरणीय ऊर्जा कंपनी सर्वोटेक पॉवर सिस्टीम (Servotech Power Company) या कंपनीमध्ये गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असणार आहे. कारण या कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड तेजी दिसून येत आहे.

शेअर मार्केटमधील या कंपनीचे रिपोर्ट पहायला गेले, तर नवकरणीय ऊर्जा कंपनी सर्वोटेक पॉवर सिस्टीमच्या शेअर्समध्ये गुरुवारी 7 ऑगस्ट रोजी प्रचंड तेजी दिसून आली आहे. या कंपनीला मोठे ऑर्डर मिळाल्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कंपनीला ऑर्डर मिळाल्यानंतर या कंपनीच्या शेअर्सची किंमत थेट 10 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचबरोबर या कंपनीच्या शेअरने आज 132 रुपये अशी उच्चांक पातळी गाठली आहे.
कंपनीला मिळाले कोट्यवधींचे कॉन्ट्रॅक्ट
सर्वोटेक पॉवर कंपनीचे शेअर्स थेट 10 टक्क्यांनी वाढण्याची कारण या कंपनीला कोट्यवधींची कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. या कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलायचे झाले, तर कंपनीला ऊर्जा साठवणूक आणि ग्रीड कनेक्टेड सिस्टीम बसवण्याकरता जवळपास 10 कोटी 20 लाख रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. त्याचबरोबर हे कॉन्ट्रॅक्ट 1.2 मेगावॅटचे आहे. तसेच या कंपनीने शेअर मार्केटला एक निवेदन देखील दिले आहे. त्यामध्ये कंपनीने असे म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील ग्राम विकास विभाग आणि उत्तर प्रदेश न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून ही ऑर्डर या कंपनीला देण्यात आले आहे.
सर्वोटेक पॉवर कंपनी मल्टीबॅगर स्टॉक
सर्वोटेक पॉवर कंपनी हा एक मल्टीबॅगर स्टॉक असून, गुंतवणूकदारांना दरवर्षी या मल्टीबॅगर स्टॉकने चांगला परतावा दिला आहे. या शेअरच्या वाढीबद्दल बोलायचे झाले, तर या शेअर्सच्या किमतीमध्ये गेल्या 5 दिवसापासून थेट सहा टक्क्यांची वाढ झाली आहे. तर महिनाभरामध्ये या शेअरमध्ये 36 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2024 पर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. यामुळेच या कंपनीने गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे