शेअर मार्केट मधील गुंतवणूक आणि दिवसागणिक या क्षेत्राचं बदलणारं गणित पाहता अनेक असे शेअर्स आहेत जे अगदी कमी किंमतीत खरेदी करुन ते उच्च किंमतीत विकून भरपूर पैसे कमावता येतात. मागिल काही आठवड्यात अशाच एका कंपनीच्या शेअर्स मध्ये अस्थिरता पाहायला मिळाली. रतन इंडिया पॉवर या कंपनीच्या शेअर्सच्या कमी जास्त होणाऱ्या किंमतींबद्दल आपण जाणून घेत आहोत तर सर्वात आधी आपण या कंपनीबद्दल माहिती मिळवूया.

RattanIndia Power कंपनीबद्दल माहिती
RattanIndia काही वर्षांपुर्वी RattanIndia इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या नावाने ओळखली जात असे, आता ही ऊर्जा क्षेत्रातील एक नामवंत भारतीय कंपनी आहे. कंपनीचे पारंपारिक लक्ष थर्मल पॉवरपेक्षा कोळशावर होते; तसेच कंपनीने अलीकडेच आपली व्याप्ती वाढवली आहे, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्सवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या कंपनीचे अमरावती आमि नाशिक येथे प्रत्येकी 1,350 औष्णिक उर्जा क्षमता असलेले प्रकल्प आहेत या प्रकल्पांची क्षमता 2,700 मेगाववॅट वीज निर्मिती करण्याची आहे. RattanIndia Power Share Price
कंपनीच्या शेअर्समधील अस्थिरता
रतनइंडिया पॉवर कंपनीच्या स्टॉकमध्ये कमालीची अस्थिरता दिसून येत आहे. मागच्याच आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 3.98% वाढीसह 17.50रुपये किंमतीवर ट्रेड केले जात होते. दिवस संपताना हा स्टॉक 17.30 रुपये किंमतीवर क्लोज झाला. त्याआधी दोन महिन्यांपूर्वी म्हणजे 4 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 21.13 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची निचांक पातळी 4.67 रुपये होती. आज 8 ऑगस्ट 2024 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक शेअर्स 3.27% उच्चांक गाठत 77.03 रुपयांना पोहोचले आहेत. RattanIndia Power Share Price
रतन इंडिया पॉवर इतर कंपन्यांचे कंपनीमधील भागभांडवल
रतनइंडिया पॉवर कंपनी ही वीज निर्मिती करणारी एक भारतीय कंपनी आहे. या कंपनीने स्वतःकडे 44.06% भागभांडवल ठेवले आहेत. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 55.94% भागभांडवल धारण केले आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने रतन इंडिया कंपनीचे 4.38% भागभांडवल घेतले आहेत. तसेच आरईसी लिमिडेट कंपनीने या कंपनीचे 1.72% भागभांडवल घेतले आहेत.
सूचना – म्युच्युअल फंड्स आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर निर्धारित असते. कोणत्याही शेअरमध्ये तुमचे पैसे गुंतविण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घेण्यास विसरु नका. RattanIndia Power Share Price