अवघ्या 3 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; खरेदीसाठी तर लागली मोठी रांग

Integra Essentia Share | प्रत्येकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा होते. परंतु अनेकदा यामध्ये तोटा मिळण्याची शक्यता असते. म्हणून कोणते शहर खरेदी करावे हे नवीन गुंतवणूकदारांना समजत नाही. तसं पहायला गेलं तर पेनी स्टॉक हे जोखीम इच्छाच असतात. परंतु असं असलं तरी देखील इंटिग्रा एस्सेन्टिया लिमिटेडचा शेअर मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी वधारला आहे. या कंपनीचा शेअर जवळपास 4 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. तसेच या शेअरची खरेदी देखील वाढली आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

इंटिग्रा एस्सेन्टिया लिमिटेडचा शेअर 4 टक्क्यांनी वाढला

इंटिग्रा एस्सेन्टिया लिमिटेडचा शेअर 4 टक्क्यांनी वाढून हा शेअर 4.09 रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे दहा रुपयांपेक्षाही कमी किंमत असलेल्या या स्मॉल कॅप स्टॉकला त्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे गुंतवणूकदारांनी देखील  त्याला मोठी पसंती दिली आहे. इंटिग्रा एस्सेन्टिया लिमिटेडच्या या शेअरने सुरुवातीच्या सत्रातच बाजी मारली. तसं पाहायला गेलं तर सोमवारी या कंपनीचा शेअर शेअर 3.97 रुपयांवर बंद झाला होता. आता इंटिग्रा एस्सेन्टिया लिमिटेड कंपनीचा शेअर तेजीत आला आहे. 

गुंतवणूकदारांनी का केला शेअर खरेदी?

इंटिग्रा एस्सेन्टिया लिमिटेड या कंपनीला ऍग्रो आणि इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायासाठी तब्बल 28 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. याची घोषणा कंपनीने शनिवारी केली होती. त्याचवेळी या कंपनीकडून असा दावा करण्यात आला होता की, ही 28 कोटी रुपयांची ऑर्डर हे त्या कंपनीची सेवा आणि उत्पादनातील गुणवत्तेचे जसे काही प्रतीकच आहे. याच कारणामुळे म्हणजेच या जबरदस्त कोट्यवधींच्या ऑर्डर मुळे गुंतवणूकदारांनी या स्मॉल कॅप स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. 

एलआयसीचाही या कंपनीमध्ये वाटा

मार्च 2024 च्या तिमाहीच्या शेवटच्या कालावधीत एलआयसीचा देखील या कंपनीमध्ये वाटा होता. तर याचप्रमाणे एलआयसीची या कंपनीत 1.06 टक्क्यांची हिस्सेदारी होती. एलआयसीने देखील या कंपनीसोबत चांगली कमाई केली आहे. जर आपण इंटिग्रा एस्सेन्टिया लिमिटेडचे मार्केट कॅपबद्दल बोलायला गेलो तर याचे मार्केट कॅप तब्बल 404 कोटी रुपये इतके आहे. तसेच इंटिग्रा एस्सेन्टिया लिमिटेड या स्मॉलकॅप स्टॉकचा NSE वरील मागच्या 52 आठवड्यातील उच्चांकी स्तर हा 7.69 रुपये प्रति शेअर असा होता, तर निच्चांकी स्तर 2.50 रुपये प्रति शेअर असा आहे. 

Leave a Comment