1 शेअरवर देत आहे कंपनी 50 रुपये लाभांश; या दिवशी झाली रेकॉर्ड तारीख

गुंतवणूकदारांना लाभांश देणाऱ्या कंपन्यांच्या लिस्ट मध्ये Neelamalai Agro Industries ये कंपनीचे नाव आहे. आणि या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत.  नीलमलाई ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड काल दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी शेअर बाजारात एक्स-डिव्हिडंड शेअर्स म्हणून ट्रेडिंग करत  होती.  संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीच्या शेअर्सवर 50 रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीच्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण झाल्याचे दिसूनही आले.  सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये शेअर बीएसईमध्ये 5000 रुपयांच्या खाली ट्रेडिंग करत असल्याचे मार्केटच्या माहितीवरुन समजते.

Neelamalai Agro Industries कंपनीच्या संचालक मंडळाच्या 29 मे 2024 रोजी झालेल्या बैठकीत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 500 टक्के लाभांश दिला जाईल अशी घोषणा करण्यात आली होती.

प्रत्येक शेअरवर 500% नफा

Neelamalai Agro Industries Ltd कंपनीच्या संचालक मंडळाच्या 29 मे 2024 रोजी बैठक झाली. या बैठकीत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर गुंतवणूकदारांना 500% लाभांश  देण्याविषयी घोषणा करण्यात आली. म्हणजे गुंतवणूकदांना प्रत्येक शेअरवर 50 रुपये नफा मिळेणार होता. कंपनीने या लाभांशासाठी 13 ऑगस्ट 2024 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती आणि काल या कंपनीमध्ये गुंतवलेल्या अनेकांना आनंदाची बातमी मिळाली असून त्यांना 500% लाभांश देखील मिळाला आहे.

तिमाही निकालही उत्कृष्ट

Neelamalai Agro Industries Ltd कंपनीचा तिमाही निकाल अत्यंत चांगला आहे.  सोमवार, 12 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार कंपनीच्या निव्वळ नफ्यात 17.92% नी वाढ झाली आहे. कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की एप्रिल ते जून 2024 दरम्यान कंपनीचा निव्वळ नफा 4.08 कोटी रुपये आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 3.46 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीच्या विक्रीतही वाढ झाली आहे. जून तिमाहीत कंपनीची विक्री वार्षिक आधारावर 25.10 टक्क्यांच्या वाढीसह 6.53 कोटी रुपये झाली आहे.

शेअर बाजारात Neelamalai Agro Industries Ltd कंपनीची कामगिरी

शेअर बाजारात Neelamalai Agro Industries कंपनीची कामगिरी खूपच चांगली असल्याचे दिसून येते. गेल्या एका वर्षात या कंपनीने स्थानबद्ध गुंतवणूकदारांना 49% परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिने गुंतवणूक केली आहे त्यांना आतापर्यंत 35% नफा मिळाला आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा नीचांक 3150 रुपये आहे.

Leave a Comment