फक्त ३ महिन्यांत गुंतवणूकदारांना १००% नाफा देणारा शेअर! कोणती आहे ही कंपनी जाणून घ्या!!!

Suzlon Energy Ltd Share Price: इलेक्ट्रिकल गुड्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या वाढीचा कल कायम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या स्टॉकने केवळ तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास १००% नफा दिला असून चालू महिन्यात १४ वर्षांच्या उच्चांक गाठला. सुझलॉन एनर्जी वेबसाइटवरील माहितीनुसार, रिन्यूएबल एनर्जी सोल्यूशन्सच्या व्यवसायात सुझलान एनर्जी वरच्या स्थानावर आहे.

इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी नवीन उच्चांकावर मुसंडी मारली आहे. गेल्या काही महिन्यांत सुझलॉनच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे खिसे चांगलेच भरले असून. सध्या या कंपनीचा शेअर्स सुसाट तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी  सुझलॉन एनर्जीचे समभाग ५% वधारले आणि अप्पर सर्किटला धडकले. सुझलॉनचा स्टॉक दीर्घकाळातच नाही तर अल्पावधीतही आपल्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे

सुझलॉनच्या स्टॉकची गरुड भरारी

जुलै महिन्यात सुझलॉनने सुमारे 47% परतावा दिला तर तीन महिन्यांत स्टॉकचा भाव 100% हून अधिक वधारल्याचे दिसून येत आहे.  म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत असे आपण म्हणून शकतो.  ९ मे २०२४ रोजी कंपनीच्या शेअरची किंमत ३९.६० रुपये होती जी आज १४ ऑगस्ट २०२४ रोजी ७६.५७ रुपये झाली असून तीन महिन्यांत शेअर्सनी १०३%ची वाढ नोंदवली आहे. Suzlon Energy Ltd Share Price

सुझलॉनच्या स्टॉकने गाठले उच्चांकाचे शिखर

विंड टर्बाइन निर्मिती कंपनी सुझलॉन एनर्जीच्या एका शेअरची किंमत सध्या ७६.५७ रुपये आहे जी १४ वर्षांतील कमाल किंमत आहे. म्हणजेच सुझलॉनचा स्टॉक १४ वर्षांनंतर नव्या शिखरावर उसळला  असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी २००८ मधेय या शेअरची कमाल किंमत ४०० रुपयांच्या आसपास होती. तेव्हापासून शेअरचा भाव सतत घसरत गेला मात्र, काही काळापासून पुन्हा वाढीचा कल दिसून येत आहे. दरम्यान, शेअर्समधील दमदार तेजीचा गुंतवणूकदारांसह कंपनीलाही मोठा फायदा झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच कंपनीचे मार्केट कॅप एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते तर सध्या कंपनीचे मार्केट कॅप सुमारे १.१० लाख कोटी रुपये आहे. Suzlon Energy Ltd Share Price

फक्त तीन महिन्यांत शेअर्स सुसाट

दिनांक ९ मे २०२४ रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स ३९.६० रुपयांना उपलब्ध होते आणि  आता तीन महिन्यानंतर म्हणजे १४ ऑगस्ट २०२४ रोजी ७६.५७ रुपयांपर्यंत वाढले आहेत. अशाप्रकारे या कालावधीत गुंतवणूकदारांनी १०२% परतावा खिशात घातला आहे. दुसरीकडे, सुझलॉनचा स्टॉक दीर्घकाळातही मालामाल करणारा ठरला आहे. इतकेच नाही तर या कंपनीने गुंतवणूकदारांना एकाच महिन्यात ५०% नफा दिला असून, एका वर्षात ३००% परतावा दिला आहे.

महत्त्वाची सूचना- स्टॉक मार्केटमधील कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन जरुर घ्या. 

Leave a Comment